About

Start your journey With us

"सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षेची सुरुवात क्षितिजा प्रकाशनने २००९ साली केली. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी या परीक्षेची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला काही मोजक्या विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही परीक्षा आज हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या १५ वर्षांत या परीक्षेने अहमदनगर जिल्ह्यातील अनेक प्रतिभावान विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ मिळवून दिले. OMR पद्धतीच्या पारदर्शक मूल्यमापनामुळे या परीक्षेने पालक व शिक्षकांचा विश्वास संपादन केला. २०२६ मध्ये या परीक्षेने नवीन उंची गाठली असून दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढतच आहे!".

01

तज्ञ
शिक्षक

आमचे तज्ञ शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेत यश मिळवण्यासाठी सखोल मार्गदर्शन करतात. इयत्ता २ री ते ८ वी साठी विशेष तयार केलेले अभ्यास साहित्य व सराव प्रश्नपत्रिका संच संपूर्ण तयारी सुनिश्चित करतात.

02

अचूक
मूल्यमापन

आमच्या परीक्षा OMR पद्धतीने संगणकीय तपासणीद्वारे १००% पारदर्शकतेने घेतल्या जातात. तज्ञांनी तयार केलेल्या संतुलित प्रश्नपत्रिका प्रत्येक विद्यार्थ्याचे अचूक मूल्यमापन सुनिश्चित करतात.

03

परीक्षा
केंद्रे

तुमच्या तालुक्यातच परीक्षा केंद्र उपलब्ध आहे कुठेही दूर जाण्याची गरज नाही. तुमच्या जवळच्या परीक्षा केंद्रावरून सहभागी व्हा आणि प्रतिभा सिद्ध करा.आमची परीक्षा केंद्रे तुमच्या जवळच आहेत

04

सदैव
साथ

नोंदणीपासून ते निकालापर्यंत परीक्षेच्या आणि सुरुवातीपासून ते सत्कार सोहळ्यापर्यंत आम्ही प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासोबत आहोत. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आमची टीम सदैव तत्पर आहे

विद्यार्थी काय म्हणतात?
विद्यार्थ्यांचे अभिप्राय